कवितांचा मळा : आईबाप

कवी : कु. पियुष गांगुर्डे
जनता विद्यालय पवननगर नाशिक
संवाद : ९९२२४११७७१

काय वर्णावी
आईबापाची किर्ती..
किर्ती वर्णण्यासाठी
लाखो शब्द अपुरे पडती !

मुलांचे असतात गुरु
असतात मार्गदर्शकही..
बाबा देतात वस्तू खेळणी
आई गोड खाऊ देई !

देव ईश्वर भगवंत
जाणा आईबापात..
मग कशाला जायचे
मंदिर आणि देवळात !

आई बनवते डबा
बाबा शाळेत सोडतात..
आई अभ्यास घेते
बाबा खेळ शिकवतात !

देवाला प्रत्येक घरी
जाणे शक्य वाटले
म्हणून देवाने प्रत्येक घरी
आईबाप बनवले !

आई अंगाई गाते
बाबा गोष्टी सांगतात..
आई चित्र शिकवते
बाबा गणित शिकवतात !

माझ्या आईबाबाचं स्वप्न
मी मोठा कवी व्हावं
तुमच्या आशीर्वादाने
मी त्यांचं स्वप्न पूर्ण करावं !

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!