इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी उदात्त भावनेच्या व्यक्ती एकत्र आल्या की खूप मोठे काम करु शकतात. याची प्रचिती नुकतीच मालेगावातील गगनभरारी समूहाच्या महिला शिक्षिकांनी पूर्णत्वास नेलेल्या एका कार्यातून आली. माणके शाळेच्या शिक्षिका वैशाली भामरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यांच्यासोबत नगरसेविका संगिता चव्हाण, उपक्रम नियोजन टीम छाया पाटील, नूतन चौधरी, मनिषा साळवे, ज्योती पाटील, साधना ब्राह्मणकर, छाया देसले व इतर मैत्रिणींनी पुढाकार घेतला. कोरोनाकाळात वैद्यकीय सोयी सुविधांच्या कमतरतेमुळे येणाऱ्या अडचणी पाहून कोविड सेंटरला मदत करायचे ठरवले. त्त्यांच्या या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी कृषिमंत्री ना. दादा भूसे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्या उपक्रमासाठी तालुक्यातील महिला शिक्षिकांकडून, आजी माजी केंद्रप्रमुखांकडून मदतीचा ओघ सुरु झाला. काही शिक्षकांनीही स्वेच्छेने मदत केली. या जमलेल्या रकमेतून कोविड रूग्णांसाठी तीन नेब्युलायझर, सात डिजिटल हॅन्ड हेल्ड पल्स आँक्सिमीटर, वीस स्टिमर, एक संपर्कासाठी फोन, वीस उशी, कोरोना रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे, ताण तणाव कमी व्हावा यासाठी म्युझिक सिस्टीम व इतर आवश्यक साहित्य घेण्यात आले. सदर साहित्य मालेगांव येथील सामान्य रूग्णालयाचे डाँ. हितेश महाले यांना ना. दादा भुसे, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष सुनील देवरे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे, केंद्रप्रमुख मोठाभाऊ निकम यांच्या समवेत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेविका अँड. ज्योती भोसले, पुष्पा गंगावणे, शिल्पा देशमुख, शारदा पवार,सुनंदा बडोगे, इंदुमती आहिरे यांनी ही मोलाचे योगदान दिले. शिक्षिका मनिषा पाटील, लता सूर्यवंशी, विजया भदाणे, अश्विनी सोनवणे, शोभा शेवाळे, ज्योस्ना काकळीज, संगीता पाटील, मनीषा ठाकूर, दिपाली वाघ, हर्षला गायकवाड, अर्चना गरुड ,रूपाली आठरे, मंजू धंधारीया, विजया ठोके, मिनाक्षी देवरे, निर्मला मावची, विजया पवार, लता वाघ, कल्पना गोविंद, कल्पना हिरे, शारदा कोर, आशा चव्हाण, उषाकिरण शेलार, मिना देवरे व गगनभरारी समूहातील सर्व शिक्षिकांचे सहकार्य लाभले.
कोरोना सारख्या राष्ट्रीय संकटात महिला शिक्षिकांनी पुढाकार घेऊन वस्तूरूपात मदत करणे अभिमानास्पद आहे. अनेक गरजू रूग्णांना यातून जिवनदान निश्चितच लाभणार – ना. दादा भूसे, कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य
वाडी वस्त्यांवर ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकांनी पुढाकार घेत समाजासमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण आहे. – जितेंद्र देवरे, गटविकास अधिकारी, मालेगांव