इगतपुरी तालुका जुनी पेन्शन संघटनेच्या अध्यक्षपदी मिलिंद खादे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – इगतपुरी तालुका जुनी पेन्शन संघटनेची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. मिलिंद खादे यांची तालुकाध्यक्षपदी तर मंदार उंडे यांची तालुका सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी नारायण गांजवे, कोषाध्यक्षपदी गुरु विधाते , तालुका नेते सौरभ अहिरराव, जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनवणे, वैभव गगे यांची निवड करण्यात आली. अनिल बागुल, कैलास बोढारे, सिद्धार्थ सपकाळे, मागासवर्गीय संघटना, एनडीपीटी संचालक उमेश बैरागी, प्रमोद परदेशी, दत्तू निसरड यांनी नवीन कार्यकारिणीच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले.

error: Content is protected !!