
इगतपुरीनामा न्यूज – कांचनगाव जिल्हा परिषद आदर्श शाळेत जागतिक महिला दिन कार्यक्रमात गावातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. सर्व महिला ह्या खूप श्रेष्ठ असून भारतीय महिलांच्या जीवनातील प्रसंग, त्यांनी भूषवलेले सर्वोत्तम स्थान याचा इतिहास सर्व महिलांना सांगण्यात आला. देशामध्ये सर्वोच्च पदावरील महिलांची ओळख यावेळी करून देण्यात आली. पदवीधर शिक्षक दत्तू साबळे, सुरेखा गुंजाळ, जितेंद्र भदाणे यांनी आपल्या भाषणात महिलांचे हक्क व कर्तव्य यावर विशेष भर देऊन महिलांचा गौरव केला. सुरेखा गुंजाळ यांनी बालरक्षा यावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान छाया गव्हाणे यांनी स्वीकारले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाजीराव माळी, शिक्षणतज्ञ चंद्रवर्धन चंद्रमोरे, गोरख गव्हाणे, रीना माळी, छाया मोरे उपस्थिती होते. शाळेतील महिला शिक्षक वर्गांचा गावातील महिलांनी आदर्श शिक्षिका म्हणून सत्कार केला. रत्ना बागुल, सुरेखा गुंजाळ, सुधाकर बाविस्कर, दत्तू साबळे, नामदेव साबळे, जितेंद्र भदाणे, विश्रांती वेताळ, सुनंदा जाधव, अनिता शिरसाट यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.