![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/05/IMG-20210521-WA0048.jpg)
कवयित्री : माधुरी पाटील, नाशिक
संवाद : 7588493260
दिला धडा कोरोनाने
मानवाला सुधाराया
पाप,पुण्य मोजायला
नको घालू वेळ वाया..!!१!!
परदेशी विषाणूने
केला प्रवेश देशात
शिकवण मानवाला
होता कारण जोशात.!!२!!
खूप झाली पापे आता
पुण्य कमवाया शिक
आता तरी वाग नीट
मागशील मग भीक.!!३!!
जिरविला माज तुझा
शांत पणे बस घरी
कोरोनाने हरविले
जगा धडा दिला परी..!!४!!
उतमात समारंभ
घाले वायाला जेवण
कधी नाही केली वेड्या
गरिबाची आठवण.!!५!!
काळा पैसा केला खर्च
पर्यटन मौजमस्ती
गुंडगिरी अत्याचार
आठवली भटकंती..!!६!!
माणुसकी विसरले
केला होता ऐशोराम
आज आठवत आहे
बेडवर रामराम.!!७!!
शिकवले कोरोनाने
एकत्रित राहायला
नको वाटणी नात्याची
मायबाप जपायला..!!८!!
नको करू मूर्खपणा
क्रूरकृत्य मानवाला
कोरोनाने शिकवले
माणुसकी जपायला..!!९!!
( कवयित्री माधुरी पाटील मोडाळे ता. इगतपुरी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. )
3 Comments