अहो आश्चर्यम…! ; त्र्यंबकेश्वर तालुक्यात सापडले २२ किलोचे रताळे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
आदिवासी बांधव आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत प्रत्येक वेळी काहीना काही झाडे आणि वनस्पती लावत असतात. अधिकाधिक भाजीपाला आपल्याजवळ असावा म्हणून त्यांचा प्रयत्न असतो. यामुळे झाडांचे संगोपन आणि बचतही होत असते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावीहर्ष येथील आदिवासी शेतकऱ्याला मिळालेला एक वेल त्याने सहजच घराजवळ लावला. त्याला नंतर कळले की तो वेल रताळ्याचा आहे. काही महिन्यांनी त्या वेलाची पाने झडून गेल्याने शेतकऱ्याने खणले असता निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला. ह्या वेलाला चक्क २२ किलोचे एकच रताळे आल्याचे दिसून आले.
आदिवासी बांधव दरवर्षी जून महिन्यात विविध उपयुक्त रोपांची लागवड आपल्या दारात किंवा घराच्या मागे करतात.  आदिवासी कुटुंब ह्या भाजीपाल्यावर काही महिने उदरनिर्वाह करतात. त्यानुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथील आदिवासी बांधव बबन पुंजारे यांनी सहजच इतर रोपांसोबत एक वेल लागवड केली. ती वेल रताळ्याची असल्याचे त्यांना काही काळाने समजले. पाने झडून गेल्याने त्यांनी ह्याचे खोदकाम केल्याने ते आश्चर्यचकित झाले. त्यांना मिळालेल्या रताळ्याचे वजन चक्क २२ किलो भरले. आपल्या देशात सापडणाऱ्या एका रताळ्याचे वजन ५० ते १०० ग्रॅम पासून १ किलोपर्यंत अगर त्याहीपेक्षा जास्त असते. सुपीक जमिनीत दीड ते ६ किलो वजनाची रताळी आढळून येतात. त्यामुळे २२ किलोचे रताळे पाहून निसर्गाची किमया पाहायला मिळाली. गावकऱ्यांनी रताळे पाहण्यासाठी गर्दी केली होती. निसर्गाच्या चमत्कारामुळे २२ किलोच्या रताळ्याचा विषय सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे. बातमीच्या शेवटी सर्वात खाली व्हिडीओ पाहता येईल.

रताळ्याविषयी थोडेसे..!
रताळ्याच्या वेलीची पाने पिवळी पडून गळू लागली म्हणजे पीक तयार झाले असे समजतात. वेली लावल्यापासून साधारणपणे चार ते साडेपाच महिन्यांत पीक तयार होते. पीक तयार झाले किंवा नाही हे ओळखण्याची दुसरी खूण म्हणजे रताळे खणून काढून मोडले असता मोडलेल्या भागातील द्रव पदार्थ त्याचा रंग न बदलता वाळतो. असे झाल्यास रताळे काढणीस तयार झाले असे समजतात. रताळे तयार झाले नसल्यास मोडलेल्या भागातील द्रव पदार्थाचा रंग काळा अथवा हिरवट होतो. तयार पिकाच्या वेली प्रथम कापून घेतात. नंतर सु. एक आठवड्यानंतर रताळी खणून काढतात. यामुळे रताळ्याची गोडी वाढते. रताळी खणून काढतेवेळी जमीन कोरडी असणे व खणताना रताळ्यांना जखम होणार नाही अशी काळजी घेणे आवश्यक असते. कारण जखम झालेल्या भागातून सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होऊन रताळी कुजतात.
२२ किलो रताळ्याचा व्हिडीओ बघा

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    के.टी.राजोळे says:

    हा रताळ्याचा वेल नही. आपल्या कडे हा वेल आदिवासी भागात आढळतो. वेलाला फाद्यावर बटाट्या सारखे फळे येतात.

  2. avatar
    igatpurinama says:

    नाना, पाने झडून गेल्याने खणले असता रताळे आढळले. रताळ्याची वेल तोडून टाकलेली आहे. जी वेल दिसतेय ती वेल तुम्ही म्हणता तीच असू शकते. मात्र रताळे २२ किलोचे आहे हे मात्र नक्की. तुम्ही स्वतः तिथं जाऊन खात्री करू शकता. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद…!

Leave a Reply

error: Content is protected !!