मे महिना अखेरपर्यंत जि. प. पं. स., मनपा, नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणुका होण्याचा अंदाज

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या पूर्वीप्रमाणे करण्याचा अध्यादेश, न्यायालयीन लढाई, ओबीसी आरक्षणाचा तिढा यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका राज्यभर रखडलेल्या आहेत. त्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामपंचायत निवडणुकाही प्रलंबित आहेत. इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट, १० पंचायत समिती गण, ६५ ग्रामपंचायती आणि इगतपुरी नगरपरिषद […]

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही, मतदार यादी अधिसूचनेमुळे सोशल मीडियात फिरतेय चुकीची बातमी!

इगतपुरीनामा न्यूज : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न […]

महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलनाचा आजच ७ वा दिवस ; डॉ. डी. एल. कराड आंदोलनात सहभागी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० –  २००५ पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु केलेली नाही. त्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असून त्यांना फक्त अडीच हजार रूपये पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. जो पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तो पर्यंत संप आणि संघर्ष असाच सुरूच राहणार आहे असे प्रतिपादन सीटुचे […]

इगतपुरीच्या शिवसेना नगरसेविका जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र घोषित

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ इगतपुरी नगरपालिकेच्या प्रभाग क्र.  ८ ( अ ) मधून निवडून आलेल्या शिवसेना नगरसेविका सीमा प्रल्हाद जाधव यांना नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरण यांनी अनर्ह अर्थात अपात्र ठरवले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे. आदिवासी सेनेचे संस्थापक दि. ना. उघाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या निवडणुक विवादानुसार हा आदेश […]

इगतपुरी पालिकेच्या शिवसेना नगरसेवकाचा एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश : आणखी ६ नगरसेवक प्रवेश करण्याची शक्यता

इगतपुरीनामाची बातमी पुन्हा एकदा खरी ठरली इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ “इगतपुरीनामा”ने इगतपुरी नगरपालिकेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता बातमीद्वारे व्यक्त केली होती. ती आज खरी ठरली. इगतपुरी येथील शिवसेना नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. लवकरच आणखी 6 नगरसेवक शिंदे गटाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. माजी […]

शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या इगतपुरी पालिकेकडे एकनाथ शिंदे गटाचे लक्ष ? : काही नगरसेवकांबाबत नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ शिवसेना रिपाई युतीचे इगतपुरी नगरपालिकेत १३ नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष अशी सत्ता असून भाजपाचे ४ नगरसेवक तर शिवसेना संबंधित १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. ह्या नगरपालिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटाचे विशेष लक्ष लागले असल्याची खमंग चर्चा सुरु झाली आहे. माजी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, नुकतेच शिंदे गटात […]

राष्ट्रवादी पुन्हा ..! भाजप नगरसेविकेसह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश : इगतपुरी तालुक्यात सध्या राष्ट्रवादीचा चांगलाच बोलबाला

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० इगतपुरी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांत सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वरचष्मा वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील सर्व भागात भक्कम स्थान निर्माण केले आहे. इगतपुरी शहरातही पक्षाचे प्राबल्य चांगलेच वाढले आहे. ह्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ याच्या उपस्थितीत इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी […]

error: Content is protected !!