नव्या रुग्णांची संख्या लक्षणीय घटली

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

इगतपुरी तालुका वासीयांसाठी आजची अक्षयतृतीया आणि रमजान खुशखबर घेऊन आली आहे. संपूर्ण तालुक्यात आज तब्बल ३८ जणांनी कोरोनाचा पराजय केला आहे. कोरोनामुक्ती झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार फक्त १० नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उपचार घेणाऱ्यांची संख्याही आज अखेर १८५ वर आली आहे. इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने घोडदौड करीत असल्याचे दिसून येते. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले की, नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यास लवकरच तालुका रोगमुक्त होण्यास हातभार लागेल.

काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडयाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत. 
- बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी

Leave a Reply

error: Content is protected !!