प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथे इगतपुरी तालुका समाज विकास फाउंडेशनच्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमीत्त शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून मराठा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेती व शेतीपूरक व्यवसायाची माहिती व प्रबोधन, मराठा समाजातील अनाठायी व खर्चिक प्रथा परंपरेवर उपाय म्हणून प्रबोधन करणे, मराठा समाजात सामुदायिक विवाह करण्यास प्रयत्न व मार्गदर्शन, खंबाळे येथील पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करणे, सध्याची सामाजिक परिस्थिती व मराठा समाज यावर प्रबोधन चर्चा आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, समस्त मराठा समाजातील असंख्य नागरिक हजर होते. जिजाऊ वंदनाने सुरु झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम महाराज सहाणे होते. प्रस्तावना संदीप पागेरे केली. मेळाव्याप्रसंगी खंबाळे येथील पीडित कुटुंबाच्या वारसांना इगतपुरी तालुका समाज विकास फाउंडेशनतर्फे ५१ हजार, उदय जाधव व दिलीप चौधरी यांच्या तर्फे ५१ हजार व एक हात मदतीचा मेळाव्यात ठेवलेल्या दानपेटीत २४ हजार २२० रुपये जमा झाले.
यावेळी शिवचरित्रकार देविदास महाराज वारुंगसे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचाराची माहिती व्याख्यानात दिली. शाहीर उत्तम गायकर यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. यावेळी माजी सैनिक विजय कातोरे यांनी सैन्यदल, पोलीस करियर याबद्दल मार्गदर्शन केले. आपापसातील तंटे गावातच मिटवण्याचे आवाहन नारायणबाबा जाधव यांनी केले. महिला सक्षमीकरणाबाबात ॲड. धरती वाजे यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात गावागावात जाऊन अनाठायी खर्चाच्या प्रथा बंद करणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेणे, मुली, भगिनी व गुणवंताना प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रम राबवण्याचा मानस यावेळी अध्यक्ष तुकाराम महाराज सहाणे यांनी व्यक्त केला. मेळाव्यानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी, राज्य, केंद्र शासन स्तरावर नवनियुक्त निवड झालेले नवतरुण, शेतकरी, पत्रकार आदींचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इगतपुरी तालुका समाज विकास फाउंडेशनचे अध्यक्ष तुकाराम सहाणे, उपाध्यक्ष उमेश खातळे, देविदास जाधव, सचिव विष्णू वारुंगसे, सहसचिव रामदास गव्हाणे, खजिनदार संदीप पागेरे, संचालक भास्कर गुंजाळ, नामदेव शिंदे, हरिश्चंद्र नाठे, विजय कातोरे, फकिरा धांडे, योगेश जाधव, विक्रम पासलकर, सागर जाधव, ॲड. कैलास शिरसाठ, मच्छिंद्र खातळे, मोहन बऱ्हे, संदीप पवार, प्रकाश गायकर, दिलीप चौधरी, विष्णू गाढवे आदींनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी समाज विकास फाउंडेशन संस्थेचे उद्धिष्ट व कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. मेळाव्यासाठी अलका जाधव, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष निलेश पाटील गाढवे, निवृत्ती जाधव, उदय जाधव, पांडुरंग वारुंगसे, अलका जाधव, मनीषा बऱ्हे, संपत काळे, रामदास धांडे, भाऊसाहेब कडभाने, रमेश जाधव, गणपत जाधव, पंडित कातोरे, रमेश गव्हाणे, जयंत गोवर्धने, जयराम धांडे, रुपेश नाठे, सागर बऱ्हे, लालचंद पाटील, नारायण भोसले, सखाराम गव्हाणे, लालचंद पाटील, दशरथ पागेरे, ॲड. भाऊसाहेब भोर, त्र्यंबक गुंजाळ, रोहिदास गोवर्धने, लकी गोवर्धने, अंबादास धोंगडे, भाऊसाहेब धोंगडे, राजाराम दिवटे, गणपत दिवटे, दिलीप मुसळे, आत्माराम मते, ॲड. रोहित उगले, कैलास चौधरी, गोरख वाजे आदींसह तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.