कवी - जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
बोलता बोलता वयाची,
वर्षे निघून गेली साठ !
श्रीमान सौभाग्यवतींची,
अजून मान आहे ताठ !!
रात्रं दिवस कष्ट करत,
आपलं वय झालं साठी !
वय झालं म्हणून तुम्ही,
हाती घेऊ नका काठी !!
आयुष्याच्या वळणावर,
आपलं वय झालं म्हातारं !
पण भविष्याचं आयुष्य,
तुम्ही जगुन घ्यावं सारं !!
एकमेकास पाहून तुम्ही,
बालपणात रमून जावं !
बाल जीवनाच्या शिट्या,
तुम्ही हळू फुकुन पाहावं !!
म्हाताऱ्या बालमित्रांचं,
फक्त वय आता वाढलं !
पण अरे कारे करण्याचं,
अजुन नातं कुठे सोडलं !!
परोपकारी राहून मित्रा,
तुम्ही पैशाने मोठे व्हा !
निर्व्यसनी जीवन जगून,
माणुसकीने मोठे व्हा !!
वय झाले म्हणा तुम्ही,
थकलो असे म्हणू नका !
जीव शरीराला जपा तुम्ही,
खंगले असे म्हणू नका !!
बालपणात रमून जावं,
हळूचं नातवांच्या कुशीत !
आनंदाचं जीवन जगा,
सदा स्वच्छंदी खुशीत !!
हाव आता कमी करा,
माझं माझं सोडून द्या !
माणुसकीचं प्रेम तुम्ही,
साऱ्या जगा वाटून द्या !!
आर्थिक संपत्तीचा ठेवा,
तुम्ही जनतेसाठी द्यावा !
गोर गरीब पीडितांचा,
तुम्ही आशीर्वाद घ्यावा !!
कवी जी. पी. खैरनार हे नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांच्या कविता आणि लेखन प्रसिद्ध असून अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत.