
इगतपुरीनामा न्यूज – महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी दिलीप रोहिदास पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. उपक्रमशील शिक्षक दिलीप पवार हे वाढोली, ता. त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शालेय विकासासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली असून ते उच्चविद्याविभूषित आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा चालवून विद्यार्थी, शिक्षक व समाजासाठी उपयुक्त कार्य करणाऱ्या शिक्षकाची निवड ह्या पुरस्कारासाठी केली जाते. मुख्याध्यापक किशोर सोनेरी व तालुक्यातील अनेक शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.