
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात अतिशय महत्वाचे गाव असणाऱ्या बेलगाव तऱ्हाळे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली आहे. युवासेनेचे जिल्हा नेते समाधान दशरथ वारुंगसे यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण १३ जागांवर पॅनलचे संचालक निवडून आले आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका, बाजार समिती आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकरी विकास पॅनलच्या विजयाचे पडसाद उमटणार आहेत. सर्व सभासदांना सोबत घेऊन शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक कामे करणार असून मतदारांनी टाकलेल्या विश्वासाचे सार्थक करू असे प्रतिपादन युवासेना जिल्हा नेते समाधान वारुंगसे यांनी केले.
शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार समाधान दशरथ वारुंगसे, कोंडाजी कारभारी आव्हाड, नामदेव महादू आव्हाड, पोपट काशिनाथ आव्हाड, सुकदेव पांडुरंग आव्हाड, अनिल नारायण वारुंगसे, पुंजा किसन वारुंगसे, यशवंत दत्तू वारुंगसे, परशराम देवराम वारुंगसे, प्रकाश गंगाधर गामणे, सुरेश लहानू तातळे, चंद्रभागाबाई निवृत्ती वारुंगसे, विमल शिवाजी वारुंगसे हे विजयी झाले आहेत. इगतपुरी तालुक्याच्या विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
