शेतकरी विकास पॅनलच्या विजयी संचालकांचा पाडळी देशमुख सोसायटी आणि ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले. यानिमित्ताने पाडळी देशमुख विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामपंचायतीतर्फ नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके आदींनी मनोगत व्यक्त केले. निवृत्ती जाधव, ज्ञानेश्वर […]

घोटी बाजार समितीतील विजयाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले कौतुक : खरेदी विक्री संघ आणि बाजार समिती पदाधिकाऱ्यांचाही केला सत्कार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाची बिनविरोध निवडणूक आणि जिल्ह्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनल निवडून आणल्याबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार आपल्या निवासस्थानी केला. इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, व्हॉइस चेअरमन जयराम धांडे यांचा सत्कार करून श्री. […]

विजयासाठी परिश्रम घेणारे शेतकरी, मतदार आणि समर्थकांचे आभार मानतो – बाजार समिती संचालक अर्जुन भोर

इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती संचालक पदाद्वारे कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असून माझ्या विजयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानतो असे प्रतिपादन नूतन संचालक अर्जुन निवृत्ती भोर यांनी केले. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचे नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा […]

शेतकऱ्यांच्या विश्वासामुळेच संचालक म्हणून सेवा करण्याची संधी लाभली : नूतन संचालक शिवाजी शिरसाठ यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त

इगतपुरीनामा न्यूज – बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलसह माझ्यावर विश्वास संपादन करून संचालक म्हणून निवडून दिले. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून बाजार समितीच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचे घोटी बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक शिवाजी शिरसाठ यांनी सांगितले. मतदार आणि शेतकऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या अग्रेसर […]

महाराष्ट्र राज्य प्राथमिक आदिवासी शिक्षक संघटनेतर्फे राज्यसेवा परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोग श्रेणी १ मध्ये कृषी उपसंचालक पदाला गवसणी घालणाऱ्या श्रद्धा उत्तम भवारी – चिखले, एमपीएससी राज्यसेवा गट १ अधिकारी म्हणून निवड झालेले कु. राहुल जाधव, वर्ग २ कक्ष अधिकारी सोमनाथ ठोकळ यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने घोटी येथे करण्यात आला. शाश्वत शेती आणि सरकारी योजना तळागाळापर्यंत […]

नांदगाव बुद्रुक सोसायटीच्या चेअरमनपदी नानाभाऊ गायकर तर व्हॉइस चेअरमनपदी मनोहर जाधव बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – नांदगाब बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची, व्हॉइस चेअरमनपदाची निवडणूक मविप्रचे माजी संचालक वसंतराव मुसळे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी नानाभाऊ त्र्यंबक गायकर तर व्हॉइस चेअरमनपदी कृष्णनगरचे मनोहर चंदर जाधव यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शशांक पगारे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा सोसायटीचे सचिव प्रमोद कहांडोळ यांनी […]

राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी दीपक घाडगे यांची नियुक्ती : तालुकाध्यक्ष भाऊसाहेब खातळे यांनी दिले नियुक्तीपत्र

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेल इगतपुरी तालुका उपाध्यक्ष पदावर पिंपळगाव घाडगा येथील दीपक वाळू घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कामगार सेलचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सखाराम खातळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र पांडुरंग लहामगे यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली आहे. दीपक घाडगे […]

घोटी येथील शिवसाई चषकाचा रॉयल्स संघ ठरला मानकरी

इगतपुरीनामा न्यूज – रामरावनगर येथे जि. प. प्राथमिक शाळेत एस. बी. क्रिकेट क्लबतर्फे खेळवण्यात आलेल्या नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल्स संघाने गेम चेंजर संघावर ६ गडी राखून मात करत शिवसाई चषकाचे सिझन तीन वर नाव कोरले. घोटी शहरातील रामराव नगर येथे गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसाई चषक नाईट अंडर […]

प्रामाणिक मेहनत करणाऱ्यांनाच यशश्री माळ घालते – उपनिरीक्षक देविदास लाड : पोलीस दलात निवड झाल्याबद्दल आशा जगदाळे हिचा सत्कार संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – ‘पोलीस सेवेत येण्यासाठी लाखो युवकांची धडपड चालू असते. ही भरती कस लावते. प्रतिभावंत आणि प्रामाणिक कष्ट घेणाऱ्या युवकांनाच यश मिळते. कधीकधी यश उशिरा मिळते. माणूस हतोत्सहित होतो आणि शॉर्टकट शोधू लागतो. हा शॉर्टकट कधीकधी लॉंगरूट ठरू शकतो. त्यामुळे मेहनतीशी प्रामाणिक राहा. भरती झालो की कष्ट संपले असे नसून सेवेत रुजू झाल्यानंतर खरी […]

धामणी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी नंदूभाऊ पगारे, उपाध्यक्षपदी दगडू भोसले : गौतम भोसले, नारायण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – इगतपुरी तालुक्यातील धामणी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य निवड माजी उपसरपंच गौतम भोसले, स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण राजे भोसले, विनायक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ पगारे, उपाध्यक्षपदी दगडू भोसले, सचिवपदी सदाशिव भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. […]

error: Content is protected !!