घोटी बाजार समितीतील विजयाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले कौतुक : खरेदी विक्री संघ आणि बाजार समिती पदाधिकाऱ्यांचाही केला सत्कार

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाची बिनविरोध निवडणूक आणि जिल्ह्यातील प्रतिष्ठित असणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनल निवडून आणल्याबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार आपल्या निवासस्थानी केला. इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, व्हॉइस चेअरमन जयराम धांडे यांचा सत्कार करून श्री. भुजबळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. घोटी बाजार समितीच्या निवडणुकीत एकतर्फी यश मिळवत १६ संचालक निवडून आणल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नूतन संचालक रमेश जाधव, सुनील जाधव, किसान काँग्रेसचे सुदाम भोर यांचाही आमदार छगन भुजबळ यांनी सन्मान केला. यावेळी त्यांनी शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी आपल्या पदाच्या माध्यमातून सेवाकार्य करा अशा शुभ कामना दिल्या. माझ्याकडून याकामी आवश्यक ते सर्व सहकार्य उपलब्ध आहे असेही ते म्हणाले.

Similar Posts

error: Content is protected !!