इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोग श्रेणी १ मध्ये कृषी उपसंचालक पदाला गवसणी घालणाऱ्या श्रद्धा उत्तम भवारी – चिखले, एमपीएससी राज्यसेवा गट १ अधिकारी म्हणून निवड झालेले कु. राहुल जाधव, वर्ग २ कक्ष अधिकारी सोमनाथ ठोकळ यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक आदिवासी शिक्षक संघटनेच्या वतीने घोटी येथे करण्यात आला. शाश्वत शेती आणि सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहून सेवा करील असे श्रध्दा भवारी – चिखले ह्यांनी सांगितले. क्रांतिकारकांचा वारसा व समाजाचा घटक म्हणून अभिमानाने काम करू असे राहूल जाधव ह्यांनी सांगितले. घोटी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने एमपीएससी व यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शिवराम झोले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार शिवराम झोले, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, पोषण आहार अधीक्षक प्रतिभा बर्डे, डॉ. हनुमंता बांगर, डॉ. जयंत कोरडे, डॉ. युवराज भांगरे, डॉ. दिगंबर चौरे, डॉ. दत्तात्रय पगारे, डॉ. श्रीराम लहामटे, डॉ. मच्छिंद्र कोरडे, डॉ. सदाशिव घाणे आदी उपस्थित होते. आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मोतीराम पवार, जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे, सचिव तुकाराम भोये, कोषाध्यक्ष हरिश्चंद्र भोये, कार्याध्यक्ष रवींद्र लहारे, इगतपुरी तालुकाध्यक्ष भावराव बांगर, सचिव जनार्दन करवंदे, राज्य संघटक उत्तम भवारी, गणेश घारे, भाऊराव कोंडुळे, योगेश गवारी, कैलास भवारी, भगवान झोले, दत्ता साबळे, सुखदेव साबळे, एम. टी. लोकरे, कोंडाजी भांगरे, भांगे सर,, प्रशांत भांबळे, हौशीराम भगत, रामदास गंभीरे, मधुकर रोमटे, अरुण भालेराव, जनार्दन कडवे आदी उपस्थित होते.