आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम प्रेरणादायी : भाजपा नेते महेश श्रीश्रीमाळ, सागर हंडोरे, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने यांच्याकडून कौतुक

इगतपुरीनामा न्यूज – आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे काम अतिशय प्रेरणादायी असून यांच्यामार्फत उत्कृष्ट खेळाडू उदयाला येत आहेत. या सर्वांच्या सामूहिक शक्तीने इगतपुरी तालुक्यातील खेळाडू आपल्या कौशल्यातून भरीव यश मिळवतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश श्रीश्रीमाळ,, भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर हंडोरे, नाशिक जिल्हा व घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने ह्यांनी व्यक्त केला. आयडियल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरी यांनी तायक्वांदो अँड फिटनेस असोसिएशन ऑफ इगतपुरी तालुका अंतर्गत तायक्वांदो बेल्ट प्रमोशन २०२५चे आयोजन केले होते. इगतपुरी येथील क्रीडा संकुल गोळीबार मैदान येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांतर्गत तायक्वांदोमध्ये कलर बेल्ट मिळालेला खेळाडूंना महेश श्रीश्रीमाळ, सागर हंडोरे, विशाल जगताप, सचिन जगताप, खंडू लहाने, मीना जगताप, देवेंद्र भावसार, इमरान शेख, माधव तोकडे, कार्तिक जगताप, सुबोद जगताप यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. क्रीडा संकुलचा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यासाठी राहुल पंडित यांनी विशेष प्रयत्न घेतले.

Similar Posts

वाहतुकीचा खेळखंडोबा – पिंपळगाव टोल प्रशासन, महामार्ग विभागाचे अधिकारी, वाहतूक पोलीस यंत्रणा आणि ठेकेदाराच्या ४२ पिढ्यांचा होतोय उद्धार : जबाबदार अधिकाऱ्यांच्या तोंडाला उद्या शिवसैनिक काळे फासणार – शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांचा इशारा

युपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे खासदार गोडसे यांच्याकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत : नाशिकच्या यूपीएससी परीक्षा केंद्रात पहिल्यांदाच परीक्षा

error: Content is protected !!