शेतकऱ्यांच्या विश्वासामुळेच संचालक म्हणून सेवा करण्याची संधी लाभली : नूतन संचालक शिवाजी शिरसाठ यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त

इगतपुरीनामा न्यूज – बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे शेतकरी विकास पॅनलसह माझ्यावर विश्वास संपादन करून संचालक म्हणून निवडून दिले. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून बाजार समितीच्या विकासासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचे घोटी बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक शिवाजी शिरसाठ यांनी सांगितले. मतदार आणि शेतकऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या अग्रेसर असलेल्या घोटी बाजार समितीच्या निवडणुकीत ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलमधून शिवाजी शिरसाठ कौल देऊन प्रचंड मतांनी निवडून दिले. याबद्धल आभार व्यक्त करताना ते बोलत होते. शिवाजी शिरसाठ म्हणाले की, लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आगामी काळात बाजार समितीच्या विकास आणि नवनवीन योजना राबवण्यासाठी आमचा कायमच भर राहील. विविध प्रकारच्या संकल्पना राबवत आधुनिक बाजार समितीसह शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून माझ्या बळीराजाला त्याचा अधिक मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवाजी शिरसाठ यांनी दिली. यावेळी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, ग्रामस्थ आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

error: Content is protected !!