वाडीवऱ्हेचे पोलीस हवालदार प्रविण काकड, हेमंत तुपलोंढे, राजेंद्र कांगणे यांचा ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरव : पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलीस निरीक्षक हेमंत भामरे आदींनी केले अभिनंदन

इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य १०० दिवस कृती आराखडा मोहीम सुरु आहे. त्या अंतर्गत वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन कडील गोपनीय, कारकुन, बीट अंमलदार विभागातील ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ हा मानाचा पुरस्कार दिला जातो. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये आदेशान्वये, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ ह्या मानाच्या पुरस्काराचे पुरस्कारार्थी घोषित केले आहेत. वाडीवऱ्हेचे पोलीस हवालदार प्रविण बाळासाहेब काकड, हेमंत तुपलोंढे, राजेंद्र कांगणे यांना २०२५ जानेवारी ते मार्च या महिन्याच्या कामगिरीसाठी ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ या पुरस्कार देवुन गौरवण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये आदेशान्वये, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस हवालदारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

मार्च महिन्यात गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार प्रविण बाळासाहेब काकड यांनी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ६ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेवुन त्या व्यक्ती हजर केल्या आहेत. एक गुन्ह्यात गावठी हत्यार जप्त केले. पासपोर्ट/वर्तन चारित्र्य पडताळणीची तात्काळ निर्गती करून प्रलंबित संख्या शून्यावर आणली आहे. पोलीस ठाणे आवारातील अवजड वाहने एका रांगेत लावुन घेवुन परिसरात स्वच्छता आणि संपूर्ण पोलीस स्टेशनला रंगरगोटी करून घेतली. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. नवीन मुद्धेमाल कक्ष, बीट अंमलदार कक्ष, स्वागतकक्ष तयार करण्यासाठी उत्कृष्ट परिश्रम घेतले. सदर पोलीस अंमलदार यांनी खालील प्रमाणे उष्ट कामगीरी केली आहे. जानेवारीमध्ये बीट अंमलदार तथा पोलीस हवालदात हेमंत तुपलोंढे यांनी वाडीवऱ्हे ठाण्यातील भाग १ ते ५ चे ४ गुन्हे, अकस्मात मृत्यू ७, प्रोव्हीशन २, अर्ज निर्गती १४, अवैध गोमांस केस १, जुगार १ केस हे गुन्हे निर्गती केले आहे. फेबुवारीत कारकुन विभागाचे पोलीस हवालदार राजेंद्र कांगणे यांनी वाडीवऱ्हे ठाण्यात जमा असलेल्या मुद्धेमालाची निर्गती केली. अभिलेख वर्गवारी मुदत बाह्य, मुद्धेमालातील २५ जप्त वाहने मालकाच्या ताब्यात देणे, वाहने एक रांगेत लावुन घेवुन परीसर स्वच्छता, मुद्धेमाल कक्ष, अभ्यागत कक्ष तयार करण्यासाठी मेहनत घेतली. म्हणून प्रविण काकड, हेमंत तुपलोंढे, राजेंद्र कांगणे यांना पुरस्कार देण्यात आला.

Similar Posts

error: Content is protected !!