दहावीची परीक्षा सुरु असतांना इगतपुरीत शिपायाचा हृदयविकाराने मृत्यू

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूलचे शिपाई केशव भोंडवे यांचा शाळेत कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे ते कर्तव्यावर आले होते. मात्र परीक्षा सुरु असतांना ११ वाजता त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. तेंव्हा त्यांना मुलगा आणि भाचा यांनी त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र एका पाठोपाठ एक असे दोन हृदयविकाराचे झटके आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. केशव भोंडवे हे एक मनमिळावू व विनम्र स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक निधनाने शाळेसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!