
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेल इगतपुरी तालुका उपाध्यक्ष पदावर पिंपळगाव घाडगा येथील दीपक वाळू घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कामगार सेलचे इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सखाराम खातळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे नाशिक जिल्हाध्यक्ष राजेंद्र पांडुरंग लहामगे यांच्या मार्गदर्शनाने ही निवड करण्यात आली आहे. दीपक घाडगे यांच्या निवडीचे इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कामगारांच्या न्याय हक्कासाठी नेहमी बांधील असून ह्या पदाच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात चांगले काम उभे करणार असल्याचे नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष दीपक घाडगे यांनी सांगितले.
