घोटी येथील शिवसाई चषकाचा रॉयल्स संघ ठरला मानकरी

इगतपुरीनामा न्यूज – रामरावनगर येथे जि. प. प्राथमिक शाळेत एस. बी. क्रिकेट क्लबतर्फे खेळवण्यात आलेल्या नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात रॉयल्स संघाने गेम चेंजर संघावर ६ गडी राखून मात करत शिवसाई चषकाचे सिझन तीन वर नाव कोरले. घोटी शहरातील रामराव नगर येथे गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसाई चषक नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेची मंगळवारी सांगता झाली. या स्पर्धेला घोटीतील क्रीडारसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेस घोटी शहरातील हिटर्स, चॅम्पियन, वॊरिअर, रायडर, गेमचेंजर, लायन्स, टायगर  व रॉयल्स असे एकूण ८ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम दिवशी उपस्थित क्रीडा रसिकांकडून खेळाडूंसाठी रोख स्वरूपात बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार भावेश बेंडकुळे याला मिळाला तर मालिकावीर पुरस्काराचा मानकरी हरीश शिरसाठ ठरला. उत्कृष्ठ फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी शंकर गायकवाड तर उत्कृष्ठ गोलंदाज पर्पल कॅपचा मानकरी सोनू करमाळकर हा ठरला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता समाधान भागडे, हरीश शिरसाठ, हेमंत कडू, समाधान सगर, मोनू करमाळकर, महेश दुर्गुडे व राहुल जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.

Similar Posts

error: Content is protected !!