इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – इगतपुरी तालुक्यातील धामणी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य निवड माजी उपसरपंच गौतम भोसले, स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण राजे भोसले, विनायक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ पगारे, उपाध्यक्षपदी दगडू भोसले, सचिवपदी सदाशिव भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीच्या कार्यक्रमावेळी सरपंच बन्सी गोडे, ग्रामसेवक सुभाष ठाकरे, तंटामुक्त समिती सदस्य सदस्य ईश्वर भोसले, सागर भोसले, संजय अर्जुन भोसले, गोपाळा नामदेव भोसले, तानाजी मधे, दिलीप घोटे, बाळू मामा वाघ, सोनाली रायकर, काळू गांगड, किसन ढोन्नर, जनक संतु भोसले, ग्रामपंचायत सदस्य संगीता लाड, बहिरू भोसले, महेंद्र पगारे, सुरेश पगारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशिल असून यापुढेही गावाच्या कल्याणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नंदूभाऊ पगारे यांनी सांगितले
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group