कऱ्होळेच्या उपसरपंचपदी चंद्रभागा राजाराम खातळे यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रभागा राजाराम खातळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सरपंच पांडुरंग खातळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आले. अध्यासी अधिकारी म्हणून लोकनियुक्त सरपंच श्रावण पांडुरंग आघाण यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ रामचंद्र आघाण, निलम रतन भवर, आशा पंढरीनाथ आघाण उपस्थित होते. निवडीची […]

कृषी दिनाच्या निमित्ताने साकुर येथील २ शेतकरी पुरस्काराने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – आज इगतपुरी तालुक्यात कृषी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भात शेतीच्या कृषी स्पर्धेमध्ये इंद्रायणी ६८ क्विंटल उत्पादन घेणारे साकुर येथील हभप रामदास महाराज सहाणे यांना प्रथम क्रमांक देऊन प्रथम पारितोषिक देण्यात आले. तुकाराम आनंदराव सहाणे यांनी इंद्रायणी वाणाचे हेक्टरी ५८ क्विंटल उत्पन्न घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. साकुर गावाला भुषणावह असणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांना […]

त्र्यंबकेश्वरच्या शिवसेना तालुकाप्रमुखपदी रवींद्र भोये यांची निवड : त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या विकासासाठी २४ तास काम करणार – रवींद्र भोये

इगतपुरीनामा न्यूज – राजकीयदृष्ट्या प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुखपदी राजकीय मातब्बर पठडीतील उमदे नेतृत्व रवींद्र भोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार एकमताने ही निवड झाली आहे. रवींद्र भोये यांना निवड झाल्याचे पत्र शिवसेना राज्यसचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर […]

खेड येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे यश : एसएससी परीक्षेत लागला ९० टक्के निकाल

इगतपुरीनामा न्यूज – एकात्मिक आदिवासी विकास विभाग नाशिक संचालित खेड शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचा एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ९० टक्के लागला आहे. कू. उर्मिला जयराम खडके या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक  पटकावून शाळेचे नाव उज्वल केले आहे. तिला शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सानप, अधीक्षक अविनाश मिस्त्री, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान पारधी, माध्यमिक […]

अस्वली येथील जनता विद्यालयात प्राजक्ता गोरख शिंदे दहावीत आली प्रथम : मविप्र संचालक संदीप गुळवे, मुख्याध्यापिका सुनीता जगताप आदींकडून अभिनंदन

इगतपुरीनामा न्यूज – अस्वली येथील जनता विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल ९१.०४ लागला आहे. सलग यावर्षीही चांगल्या निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी चांगली बाजी मारली. मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक ॲड. संदीप गुळवे, मुख्याध्यापिका सुनीता जगताप आणि शाळा व्यवस्थापन समितीसह विविध मान्यवरांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ८५ टक्के गुण मिळवून प्राजक्ता गोरख शिंदे ही विद्यालयात […]

ज्योती भास्कर सोनवणे दहावी परीक्षेत गोंदे दुमाला विद्यालयात प्रथम ; कांचन दिलीप शेलार हिला मिळाला दुसरा क्रमांक

इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु. ज्योती भास्कर सोनवणे हिने इयत्ता दहावीत ९० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. दुसरा क्रमांक कांचन दिलीप शेलार, तिसरा क्रमांक रोहिणी मोहन जाधव, चौथा क्रमांक राणी लक्ष्मण राव तर पाचवा क्रमांक गायत्री केरू ठाणगे हिने पटकावला. ज्योतीचे वडील इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे, […]

अभिजित बारवकर यांची इगतपुरीच्या तहसीलदार पदावर शासनाकडून नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची बदली होऊनही गेल्या महिन्यापासून नवीन तहसीलदारांची नियुक्ती झालेली नसल्याने श्री. कासुळे यांच्याकडे इगतपुरीच्या तहसीलदार पदाचा कार्यभार होता. आज शासनाने इगतपुरीच्या तहसीलदार पदावर अभिजित शहाजी बारवकर यांची नियुक्ती केल्याचा आदेश निर्गमित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात निवासी नायब नायब तहसीलदार म्हणून अभिजित बारवकर यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. इगतपुरी […]

सीएमए नाशिक चॅप्टरच्या अध्यक्षपदी आरिफखान मन्सुरी, उपाध्यक्षपदी अमित जाधव यांची एकमताने निवड

इगतपुरीनामा न्यूज – सीएमए इन्स्टिट्यूट नाशिक चॅप्टरची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सन २०२३-२७ च्या कार्यकारिणीसाठी सर्वात जास्त मते असणाऱ्या ९ उमेदवारांची कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपद आरिफखान मन्सुरी यांना तर उपाध्यक्षपद अमित जाधव यांना मिळाले. सचिव म्हणून धनंजय जाधव, खजिनदारपदी मैथिली मालपुरे यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रकाश राजपूत, कैलास शिंदे, मयुर […]

कोरोनातील सर्वोत्तम कामगिरीबद्धल गोरख बोडके यांना लोकमततर्फे दुबईच्या हॉटेल ग्रँड हयात येथे बेस्ट सोशल वर्कर इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान : मिळालेला जागतिक पुरस्कार माझ्या इगतपुरी तालुक्यातील जनतेच्या चरणी समर्पित – गोरख बोडके

इगतपुरीनामा न्यूज – कोरोनामुळे रोजगार ठप्प, खाण्यापिण्यांची भ्रांत, संचारबंदी, आजारपण आणि कोरोनाची संभाव्य लागण, औषधे, लसीचा तुटवडा, बेडच्या समस्या, ऑक्सिजन मिळेना आणि कोणी जवळचेही कोणी उभे करीना अशा अत्यंत भयानक अवस्थेत इगतपुरी तालुक्यातील सामान्यातला सामान्य माणूस कोरोनाचा काळ सोसत होता.  इगतपुरी तालुक्यातील एकच अवलिया व्यक्ती देवदूत बनून जातीधर्माच्या पलीकडे जाऊन फक्त माणसाच्या हृदयातला परमेश्वर प्रसन्न […]

घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवून शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व स्थापित केले. त्यानंतर आज सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली. सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी कामकाज पाहिले. बाजार समितीचे […]

error: Content is protected !!