इगतपुरीनामा न्यूज – राजकीयदृष्ट्या प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या शिवसेना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुखपदी राजकीय मातब्बर पठडीतील उमदे नेतृत्व रवींद्र भोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार एकमताने ही निवड झाली आहे. रवींद्र भोये यांना निवड झाल्याचे पत्र शिवसेना राज्यसचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून सर्व सामान्यांच्या अडचणींना प्रशासन दरबारी न्याय मिळवून देण्यात रवींद्र भोये अग्रेसर आहेत. त्यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोना काळात मुख्य भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या अनेक सामाजिक कामांची दखल घेऊन त्यांच्यावर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना राज्यसचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते रवींद्र भोये यांना त्र्यंबकेश्वर तालुकाप्रमुख पदावर बिनविरोध निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या विकासासाठी २४ तास काम करणार असून सामान्य माणसासाठी नेहमीच तत्पर आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र भोये यांनी दिली. यावेळी जिल्हाप्रमुख ( शहर )अजय बोरस्ते, ग्रामीण जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी नगराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, युवा नेते मिथुन राऊत, इगतपुरी तालुकाप्रमुख संपत काळे, त्र्यंबकेश्वर उपतालुकाप्रमुख रघुनाथ गांगोडे, अशोक लांघे, विठ्ठल पवार, अरुण काशीद, विष्णू बेंडकोळी, अंबादास बेंडकोळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group