कोरोनातील सर्वोत्तम कामगिरीबद्धल गोरख बोडके यांना लोकमततर्फे दुबईच्या हॉटेल ग्रँड हयात येथे बेस्ट सोशल वर्कर इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान : मिळालेला जागतिक पुरस्कार माझ्या इगतपुरी तालुक्यातील जनतेच्या चरणी समर्पित – गोरख बोडके

इगतपुरीनामा न्यूज – कोरोनामुळे रोजगार ठप्प, खाण्यापिण्यांची भ्रांत, संचारबंदी, आजारपण आणि कोरोनाची संभाव्य लागण, औषधे, लसीचा तुटवडा, बेडच्या समस्या, ऑक्सिजन मिळेना आणि कोणी जवळचेही कोणी उभे करीना अशा अत्यंत भयानक अवस्थेत इगतपुरी तालुक्यातील सामान्यातला सामान्य माणूस कोरोनाचा काळ सोसत होता.  इगतपुरी तालुक्यातील एकच अवलिया व्यक्ती देवदूत बनून जातीधर्माच्या पलीकडे जाऊन फक्त माणसाच्या हृदयातला परमेश्वर प्रसन्न करण्यासाठी लोकांचा तारणहार बनला. हा देवदूत कोरोनाकाळात एकही क्षण उसंत न घेता क्षणोक्षणी कोरोनाची भीती न बाळगता लोकांच्या सेवेत दाखल झाला. ते किमयागार व्यक्ती म्हणजे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके. इगतपुरी तालुक्यातील गावागावात, वाड्यापाड्यांवर स्वतःच्या खर्चातुन अन्नधान्य, रुग्णांना उपचार, दिलासा, अत्यावश्यक ऑक्सिजन, औषधे, मास्क, सॅनिटायझर, कपडे, लसी, रुग्णालयात बेड, बिल कमी करून देणे इत्यादी मौलिक कामे त्यांनी पार पाडली. प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात राहून चांगले काम उभे करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. राजकारण विरहित सेवाकार्य करणारा हा देवदूत कोरोनाच्या नंतरही लोकांच्या सेवेत सदैव उभाच आहे. ह्या पार्श्वभूमीवर दै. लोकमत ह्या जगातील नंबर एक मराठी वृत्तपत्रातर्फे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांना कोविड काळातील बेस्ट सोशल वर्कर हा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आज सन्मानपूर्वक वितरित करण्यात आला. दुबई येथील पंचतारांकित हॉटेल ग्रँड हयात येथील भव्यदिव्य कार्यक्रमात महाराष्ट्राचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, लोकमत मीडिया ग्रुपचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, दुबई स्पोर्ट्सचे अब्दुल रहमान फलकनाझ, पारस शहादादपुरी, रिझवान साजन, धनंजय दातार, अभिनेत्री नुसरत भारुचा, हाजी अरफत शेख, साजी उल मुल्क, निलेश भटनागर चंद्रप्रकाश सिरोदा, सोहन रॉय, अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्रार्थना बेहरे आदी मान्यवरांनी गोरख बोडके यांना सन्मानपूर्वक पुरस्कार बहाल केला. इगतपुरी तालुक्यातील गोरगरीब जनतेचा आशिर्वादामुळे आज मिळालेला जागतिक पुरस्कार माझ्या तालुक्यातील जनतेच्या चरणी समर्पित करतो असे प्रतिपादन यावेळी गोरख बोडके यांनी केले. सेवेला धर्म मानून इगतपुरी तालुक्याची सेवा अविरत सुरूच ठेवणार असून लोकांनी दिलेले लाखो आशीर्वाद सुद्धा जागतिक पुरस्काराच्या तोलामोलाचे आहे असेही ते म्हणाले. इगतपुरी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी गोरख बोडके यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्धल आनंद व्यक्त करून त्यांचे भरभरून अभिनंदन केले आहे. कोरोनाकाळातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकमततर्फे दुबई येथे पुरस्कार मिळाल्याबद्धल अनेक  मान्यवर व हितचिंतक मित्र मंडळी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

error: Content is protected !!