अभिजित बारवकर यांची इगतपुरीच्या तहसीलदार पदावर शासनाकडून नियुक्ती

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची बदली होऊनही गेल्या महिन्यापासून नवीन तहसीलदारांची नियुक्ती झालेली नसल्याने श्री. कासुळे यांच्याकडे इगतपुरीच्या तहसीलदार पदाचा कार्यभार होता. आज शासनाने इगतपुरीच्या तहसीलदार पदावर अभिजित शहाजी बारवकर यांची नियुक्ती केल्याचा आदेश निर्गमित केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात निवासी नायब नायब तहसीलदार म्हणून अभिजित बारवकर यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. इगतपुरी तालुक्यात तहसीलदार म्हणून बदली झाल्याने त्यांच्या कार्याचा ठसा जनतेला उपयुक्त ठरणार आहे.

Similar Posts

error: Content is protected !!