
इगतपुरीनामा न्यूज – आज इगतपुरी तालुक्यात कृषी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भात शेतीच्या कृषी स्पर्धेमध्ये इंद्रायणी ६८ क्विंटल उत्पादन घेणारे साकुर येथील हभप रामदास महाराज सहाणे यांना प्रथम क्रमांक देऊन प्रथम पारितोषिक देण्यात आले. तुकाराम आनंदराव सहाणे यांनी इंद्रायणी वाणाचे हेक्टरी ५८ क्विंटल उत्पन्न घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. साकुर गावाला भुषणावह असणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांना आज सन्मानपूर्वक पुरस्कार देण्यात आला. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी सहाय्यक के. एस. सोनवणे, नाना भाऊ पवार, अशोक राऊत, भास्कर गीते आदींनी केलेल्या मार्गदर्शनामुळे योग्य ते यश साधायला मदत झाली असे गुणवंत शेतकरी म्हणाले.