

इगतपुरीनामा न्यूज – अस्वली येथील जनता विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल ९१.०४ लागला आहे. सलग यावर्षीही चांगल्या निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी चांगली बाजी मारली. मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक ॲड. संदीप गुळवे, मुख्याध्यापिका सुनीता जगताप आणि शाळा व्यवस्थापन समितीसह विविध मान्यवरांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ८५ टक्के गुण मिळवून प्राजक्ता गोरख शिंदे ही विद्यालयात प्रथम आली आहे. प्रणव मदन बोराडे, रोहन विष्णु बोराडे ह्या दोघांना ८३ टक्के मिळाल्याने ते दोघेही द्वितीय आले आहेत. तिसरा क्रमांक ओमकार रामनाथ गुळवे, अस्मिता विष्णु यंदे यांनी पटकावला. चौथा क्रमांक पायल रंगनाथ ठाणगे हिला तर पूजा जयराम धोंगडे, रविना समाधान गाडेकर ह्या दोघींना पाचवा क्रमांक मिळाला. गुणवंत विद्यार्थ्यांचे परिसरात अभिनंदन सुरु आहे.