
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रभागा राजाराम खातळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सरपंच पांडुरंग खातळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आले. अध्यासी अधिकारी म्हणून लोकनियुक्त सरपंच श्रावण पांडुरंग आघाण यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ रामचंद्र आघाण, निलम रतन भवर, आशा पंढरीनाथ आघाण उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच माजी सरपंच पांडुरंग खातळे, ग्रामस्थ हिरामण निमसे, संतू मडके, भरत खातळे, निवृत्ती खातळे, अर्जुन खकाळे, दिनकर खातळे, रतन भवर, विठ्ठल खातळे, अंकुश आघाण, अशोक आघाण, राजाराम खातळे, बापु निमसे, सुनिल खातळे, दिनकर खकाळे, त्र्यंबक खातळे, तुकाराम खातळे, लक्ष्मण खातळे, बंटी खातळे, गंगाराम भगत, दिनकर बांडे, शिवाजी आघाण, विशाल खातळे, गेणु खातळे, दत्तु खातळे, गोविंद खातळे आदी ग्रामस्थांनी जल्लोष केला. चंद्रभागा खातळे यांचे इगतपुरी तालुक्यातून अभिनंदन सुरु आहे.