इगतपुरीनामा न्यूज – एकात्मिक आदिवासी विकास विभाग नाशिक संचालित खेड शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचा एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ९० टक्के लागला आहे. कू. उर्मिला जयराम खडके या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्वल केले आहे. तिला शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सानप, अधीक्षक अविनाश मिस्त्री, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान पारधी, माध्यमिक शिक्षक राजेंद्र पाटील, परसराम भोसले, रवींद्र हुजरे, अंकुश वाजे आदींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आश्रमशाळेचे सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, कला क्रीडा संगणक शिक्षक, सर्व कर्मचारी, सर्व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे शाळेचा निकाल उत्तम लागला असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. आश्रमशाळेत दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविले जात असून याचा नक्कीच विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा स्पर्धा , स्कॉलरशिप, इतर स्पर्धा परीक्षामध्ये उपयोग होत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना विविध विषयांत आवड निर्माण होत आहे. एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group