मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे एकहाती वर्चस्व

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही गावांतील संपूर्ण पॅनल निवडून आले आहे. विशेष म्हणजे मोडाळे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेल्या शिल्पा आहेर आणि ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून […]

१६ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित ; युवकांचा वरचष्मा सिद्ध

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणूकीच्या निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. ग्रामपंचायतीचे लागलेले निकाल पाहता युवकांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी संपन्न झाली. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विजयाची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार आणि […]

कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानचे कृषी विज्ञान पुरस्कार जाहीर : १६ नोव्हेंबरला सोनोशी येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

  इगतपुरीनामा न्यूज – कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान सोनोशी यांच्यातर्फे गेल्या वर्षापासून कृषी विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यावर्षी कृषी विज्ञान शास्त्रज्ञ विभागातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना त्यांच्या ज्वारीच्या विविध जातीच्या संशोधनासाठी शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या शोधनिबंधाचे जगभर संदर्भ वापरले जातात. शेतकरी विभागातून […]

कुर्णोलीच्या उपसरपंचपदी वनिता जोशी बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – कुर्णोलीच्या उपसरपंचपदी वनिता जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पद्धतीने मावळते उपसरपंच रंगनाथ जोशी यांनी राजीनामा दिल्या नंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड झाली. निवडीदरम्यान उपसरपंचपदासाठी वनिता जोशी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिननिवड झाली., सरपंच शालुबाई तेलम, ग्रामसेवक स्वाती गोसावी यांनी निवडीचे कामकाज पाहिले. मावळते उपसरपंच रंगनाथ जोशी, वाळू तेलम, […]

टाके घोटी ग्रामपंचायतीच्या दोन जागा बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज –  टाके घोटी ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक मधील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. पंचवीस वर्षाची परंपरा कायम ठेवत वार्ड एक मध्ये दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, माजी सरपंच नंदू भटाटे, नारायण नाठे, मदन लहाने, अनिल तोकडे, दशरथ भटाटे, रवींद्र भटाटे, रमेश मानवढे, गोरख दुभाषे, केशव लहाने, राजाराम लहाने, उत्तम […]

बेलगाव तऱ्हाळेच्या उपसरपंचपदी प्रमिला भरत वारुंगसे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – बेलगाव तऱ्हाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. प्रमिला भरत वारुंगसे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, तानाजी आव्हाड, विजय कर्डक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड बिनविरोध झाली. यावेळी सरपंच अशोक मोरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, सुवर्णा आव्हाड, बबाबाई […]

शेणित सोसायटीच्या चेअरमनपदी समाधान देवराम घाडगे ; व्हॉइस चेअरमनपदी सुभाष निवृत्ती घाडगे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शेणित सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चेअरमनपदासाठी समाधान देवराम घाडगे तर व्हॉइस चेअरमनपदासाठी सुभाष निवृत्ती घाडगे यांचा एकमेव अर्ज विहित वेळेत प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी केली. यावेळी संचालक […]

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी गोरख बोडके ; ना. भुजबळ यांनी दिले नियुक्तीपत्र : एकाचवेळी भूषवणार प्रदेश सरचिटणीस आणि कार्यकारी जिल्हाध्यक्ष पद

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदावरील नुकतीच सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गोरख बोडके यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरख बोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर आज निवड करण्यात आली. यासोबतच […]

सरळसेवा प्रविष्ठ वर्ग १ अभियांत्रिकी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी हरिभाऊ गिते यांची फेरनिवड

इगतपुरीनामा न्यूज – सरळसेवा प्रविष्ठ वर्ग १ अभियांत्रिकी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे शनिवारी नाशिक येथे पार पडली. यामध्ये २०२३-२५ या वर्षाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नाशिकचे प्रादेशिक जलसंधारण अघिकारी इंजि. हरिभाऊ गिते यांची अध्यक्ष म्हणुन फेरनिवड झाली आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेंद्र नाकील, सार्वजनिक बांधकाम […]

राष्ट्रीय हिंदू कार्यकर्ता महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संतोष घुगे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – संतोष बाबुराव घुगे यांची राष्ट्रीय हिंदू कार्यकर्ता महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रात हिंदू धर्म रक्षण, गोमाता संरक्षण, महिला आणि युवतींवर होणारे अत्याचार, अनाथ बाळ गोपाळ वृद्ध सेवा अशा अनेक प्रकारच्या मानव सेवा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभर हिंदू धर्माची व्याप्ती वाढवावी, धर्म आणि लोकांचे संरक्षण […]

error: Content is protected !!