इगतपुरीनामा न्यूज – सरळसेवा प्रविष्ठ वर्ग १ अभियांत्रिकी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे शनिवारी नाशिक येथे पार पडली. यामध्ये २०२३-२५ या वर्षाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नाशिकचे प्रादेशिक जलसंधारण अघिकारी इंजि. हरिभाऊ गिते यांची अध्यक्ष म्हणुन फेरनिवड झाली आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेंद्र नाकील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता किशोर पाटील उपस्थित होते. राज्याच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान मोठे मोलाचे आहे. अभियंत्यांनी समाजोपयोगी होऊन वेळेत कामे पुर्ण करावी, असे प्रमुख पाहुणे किशोर पाटील म्हणाले. महेंद्र नाकील यांनी यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाला असल्याने पाण्याचा वापर योग्य करुन योग्य नियोजन करावे असे सांगितले. अध्यक्ष म्हणुन हरिभाऊ गिते यांनी संघटनेकडून सामाजिक कार्य करण्यावर आणखी भर दिला जाईल असा शब्द दिला. बैठकीत शासनाच्या कंत्राटी भरतीला संघटना स्तरावर विरोध करण्यात आला. अभियंत्यांनी आपली प्रतिमा जपून दर्जेदार कामे करावी, अशा सुचना करण्यात आल्या. संघटनेच्या बैठकीत जलसंपदा व सार्वजनिक विभागाच्या महामंडळावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणुन नेमणुक होण्याबाबत ठराव करण्यात आला. वार्षिक सभेप्रसंगी जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभागाचे शेकडो सहाय्यक अभियंता श्रेणी -१ या संवर्गातील अभियंते राज्यातील विविध भागातून उपस्थित होते.
नविन कार्यकारणी अशी आहे
अध्यक्ष - हरिभाऊ गिते , प्रादेशिक जलसंधारण अधिकारी
सरचिटणीस- संदिप पाडांगळे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग
कोषाध्यक्ष - प्रविण पाबळे, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग
मार्गदर्शक - महेंद्र नाकील, जलसंपदा अधिक्षक अभियंता निवृत
उपाध्यक्ष - देवेंद्र सरोदे, यशवंत पाटील, राजेंद्र बोरकर, मनोज नाईक, अमरसिंह पाटील, श्रीमती अनिता पराते.
सहसचिव -सुनिल पाटील, विनोद पाटील, बाळु सानप, अभिजीत नितनकरे, सुजित काटकरे, केतन पवार
संघटन सचिव - मुकेश ठाकुर, विवेक लव्हाट, सुरज शिंदे,
महिला प्रतिनिधी - श्रीमती सविता भंडारी, ललितागौरी गिरीबुवा, प्रांजली टोंगसे, रजनी पाटील, योगिता जोशी, स्वाती ठेले, किर्ती पाटील.
जनसंवाद सचिव - दिलीप काळे, सुमित पाटील, अमोल पंडीत