
इगतपुरीनामा न्यूज – कुर्णोलीच्या उपसरपंचपदी वनिता जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. आवर्तन पद्धतीने मावळते उपसरपंच रंगनाथ जोशी यांनी राजीनामा दिल्या नंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड झाली. निवडीदरम्यान उपसरपंचपदासाठी वनिता जोशी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिननिवड झाली., सरपंच शालुबाई तेलम, ग्रामसेवक स्वाती गोसावी यांनी निवडीचे कामकाज पाहिले. मावळते उपसरपंच रंगनाथ जोशी, वाळू तेलम, मदन तेलम, कुसुम गटकळ हे सदस्य उपस्थित होते. माजी सरपंच विलास जोशी, बाळू जोशी, राजू जोशी, मछिंद्र जोशी, धनराज गोईकणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड झाली. यावेळी संतोष ठमके, बाळू जोशी, जयराम गोईकणे, नारायण गोईकणे, पांढरी जोशी, ओमकार भगत, भगवान जोशी, अंकुश जोशी, लहू जोशी, हिरामण जोशी, धोंडीराम जोशी, श्रीराम जोशी, पंढरी गिते, बजरंग शिंगोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.