इगतपुरीनामा न्यूज – बेलगाव तऱ्हाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. प्रमिला भरत वारुंगसे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, तानाजी आव्हाड, विजय कर्डक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड बिनविरोध झाली. यावेळी सरपंच अशोक मोरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वारुंगसे, सुवर्णा आव्हाड, बबाबाई मोरे, अंकुश मोरे, योगेश तातळे, सुशीला तातळे, रत्ना तातळे उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला यावेळी विष्णू वारूंगसे, हिरामण आव्हाड, सोमनाथ वारुंगसे, रमेश वारुंगसे, अनिल सोनवणे, रतन वारुंगसे, रामकृष्ण वारुंगसे, बाळु जगदाळे, अशोक आव्हाड, संजय आव्हाड, नामदेव आव्हाड, सोमनाथ घुगे, बाळु मोरे, भीमा वारूंगसे, सोपान वारुंगसे, अतुल आव्हाड, सागर वारुंगसे, सचिन आव्हाड, विशाल वारुंगसे, अंकुश जमधडे, शंकर पानेकर, ग्रामसेविका प्रमिला गोसावी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group