इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शेणित सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हॉइस चेअरमन पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चेअरमनपदासाठी समाधान देवराम घाडगे तर व्हॉइस चेअरमनपदासाठी सुभाष निवृत्ती घाडगे यांचा एकमेव अर्ज विहित वेळेत प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी केली. यावेळी संचालक दिनकर घाडगे, रामनाथ जाधव, अरुण जाधव, भावराव जाधव, धनंजय गोणके, खरेदी विक्री संघाच्या संचालक आशाबाई देवगिरे, सुनिता जाधव उपस्थित होते. निवडीसाठी इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, जेष्ठ नेते रतन पा. जाधव, पिंपळगाव घाडगाचे सरपंच देविदास देवगिरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बहिरु घाडगे, विजय तुपे, समाधान टोचे, राजु गोडे, पोलीस पाटील संदीप घाडगे, दत्तु जाधव आदी कार्यकर्त्यांनी निवडीची घोषणा होताच जल्लोष केला.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group