भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील थेट सरपंचपदांसाठी यापूर्वी काढलेले आरक्षण २०२० पासून ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी लागू आहे. मात्र आरक्षणाची टक्केवारी न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलली जाणार आहे. यासाठी इगतपुरी तहसीलदार कार्यालयात ९ जुलैला दुपारी बारा वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. अनुसूचित क्षेत्रातील सरपंच आरक्षण जवळपास जैसे थे असणार […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा निवडणुकीपूर्वी इगतपुरी तालुक्यातील अनेक महत्वाच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा रणसंग्राम पार पडणार होता. मात्र लोकसभेच्या धुरळ्यामुळे ह्या निवडणुका रखडल्या गेल्या. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर तरी ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची अपेक्षा ग्रामीण भागात व्यक्त करण्यात येत होती. तथापि तालुक्यातील निवडणूक यंत्रणेकडून अद्याप याबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने ग्रामपंचायत निवडणुका […]
इगतपुरीनामा न्यूज – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती पवार यांच्याकडून नागोसली ( वैतरणा ) आणि ओंडली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नागोसली ( वैतरणा ) येथील लोकनियुक्त सरपंच काशिनाथ सक्रू होले, उपसरपंच अशोक दत्तू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे, संजय होले, चंदर गिरे, शंकर खातळे आणि ओंडलीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाग घेतलेल्या सर्व उमेदवारांनी ५ डिसेंबरपर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे. निकाल घोषित झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत हा खर्च दाखल करणे गरजेचे आहे. यासाठी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. निवडणूक खर्च दाखल करण्याचा ३० दिवसाचा कालावधी विचारात घेता ट्रू वोटर ॲप डाऊनलोड […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील पोटनिवडणूकीत सरपंचपदी माणिक निवृत्ती बिन्नर यांचा भरघोस मतांनी विजय झाला. विजयी झाल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. वार्ड क्रमांक तीन सर्वसाधारण जागेवर सौ. लहानुबाई जगन लोहरे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी रामचंद्र रोंगटे, गणेश रोंगटे, जनार्दन निसरड, उत्तम बिन्नोर, […]
इगतपुरीनामा न्यूज – गेल्या २५ वर्षांपासून सरपंच नसलेल्या नांदगाव सदो ह्या गावाला लोकनियुक्त सरपंच लाभले आहेत. संपूर्ण इगतपुरी तालुक्यात वेगळी ओळख असणाऱ्या ह्या गावाच्या निवडणुकीकडे संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील राजकीय क्षेत्राचे विशेष लक्ष लागले होते. सौ. अनिता प्रभाकर राक्षे यांची गावाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या रूपाने नांदगाव सदो ह्या गावाला अखेर लोकप्रतिनिधी मिळाल्याने विकासाला […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही गावांतील संपूर्ण पॅनल निवडून आले आहे. विशेष म्हणजे मोडाळे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेल्या शिल्पा आहेर आणि ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरवात होणार आहे. त्यानंतर पहिला निकाल सकाळी साडेदहा वाजेपर्यंत अपेक्षित असून साधारणपणे दुपारी १२ च्या दरम्यान सर्व निकाल हाती येतील, असे नियोजन तहसीलदार प्रशासनाकडून करण्यात आले आहे अशी माहिती इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी दिली आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वतीने […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देण्यासह आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत परिणामकारक ठरणाऱ्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसह १७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. १६ ते २० ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान तर निकाल ६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन तर पोटनिवडणूकीसाठी पारंपरिक […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी अपात्र घोषित केल्याचा आदेश नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी कायम केला आहे. अनर्ह झालेल्या सरपंच ताई बिन्नोर यांचे अपील फेटाळण्यात येऊन मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम करण्यात आला आहे याप्रकरणी शिवाजी एकनाथ फोकणे […]