
इगतपुरीनामा न्यूज – संतोष बाबुराव घुगे यांची राष्ट्रीय हिंदू कार्यकर्ता महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रात हिंदू धर्म रक्षण, गोमाता संरक्षण, महिला आणि युवतींवर होणारे अत्याचार, अनाथ बाळ गोपाळ वृद्ध सेवा अशा अनेक प्रकारच्या मानव सेवा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगण्यात आले आहे. संपूर्ण राज्यभर हिंदू धर्माची व्याप्ती वाढवावी, धर्म आणि लोकांचे संरक्षण करून राष्ट्रीय हिंदू कार्यकर्ता संघाचा नावलौकिक उज्वल करावा असेही संघाच्या वतीने सांगण्यात आले. राष्ट्रीय हिंदू कार्यकर्ता संघाने संतोष घुगे यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी देऊन विश्वास व्यक्त केला आहे. हा विश्वास निश्चितपणे सार्थ ठरवू. संघाला अपेक्षित असलेले सर्व काम प्रामाणिपणाने पूर्ण करू. लवकरच याबाबत प्रभावी व्यवस्थापन करून कार्याचे नियोजन करू असे संतोष घुगे म्हणाले. त्यांच्या निवडीबद्धल त्यांचे राज्यभर अभिनंदन सुरु आहे.