
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही गावांतील संपूर्ण पॅनल निवडून आले आहे. विशेष म्हणजे मोडाळे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेल्या शिल्पा आहेर आणि ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आलेल्या वनिता गोऱ्हे ह्या दोघी गोरख बोडके यांच्या सख्ख्या भाच्या आहेत. विकासासाठी ह्या भागातील तिन्ही ग्रामपंचायती नेहमीच अग्रेसर असून एकहाती सत्ता मिळाल्याने विकासाला अजून वेग येणार आहे. निकालाची घोषणा होताच तिन्ही गावातील समर्थक आणि ग्रामस्थांनी जल्लोष केला. मोडाळेच्या सरपंच म्हणून शिल्पा आहेर तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून सीताबाई जगताप, मंदा बोडके, गोरख गोऱ्हे, आशा गांगड, वनिता गोऱ्हे, सुरेश लहांगे, गणेश ढोन्नर, ज्ञानेश्वर झोले, काजल बिन्नर निवडून आले. शिरसाठेच्या सरपंचपदी सुनीता सदगीर, तर सदस्य म्हणून अनिता चंदगीर, दशरथ ढोन्नर, वर्षा बोडके हे निवडून आले. कुशेगांवच्या सरपंचपदी एकनाथ गुलाब कातोरे तर सदस्यपदी वंदना सोनवणे, गोटीराम हंबीर, पारू सराई, येसू सराई, कमळाबाई पारधी, ताईबाई आगिवले, बबन खडके, गणेश सराई, चिऊबाई आगिवले हे निवडून आले. सर्व विजयी उमेदवारांना गोरख बोडके यांनी शुभेच्छा देऊन विकासासाठी सोबत असल्याचा शब्द दिला.

