१६ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित ; युवकांचा वरचष्मा सिद्ध

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणूकीच्या निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. ग्रामपंचायतीचे लागलेले निकाल पाहता युवकांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी संपन्न झाली. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विजयाची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत विजयोत्सव साजरा केला. ह्या मतमोजणीसाठी तालुका प्रशासनाने याआधी झालेल्या मतमोजणीपेक्षा अतिशय सुंदर आणि चोख नियोजन केले. याबद्धल सर्वांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे.  

असा आहे निकाल ओंडली – सरपंच प्रकाश बाळु खडके, महादु खातळे, सविता लोते, रूपाली खातळे, सिताराम वाघ, सविता खातळे, चंद्रकांत वाघ, बेबीताई शेंडे, मोगरे – सरपंच सरपंच प्रताप विठ्ठल जाखेरे, सदस्य भाऊसाहेब जाखेरे, शिवाजी जाखेरे, सोनी गवारी, दत्तु गवारी, आक्का गवारी, चंद्रभागा जाखेरे, योगिता उघडे, एकनाथ नाडेकर, सिता जाखेरे, दौंडत – सरपंच पांडुरंग शिंदे, सदस्य संजय शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप बोराडे, जया बोराडे, मीनाक्षी उदावंत, रत्ना गावंडे, स्मिता शिंदे, कुशेगांव – एकनाथ गुलाब कातोरे, सदस्य वंदना सोनवणे, गोटीराम हंबीर, पारू सराई, येसू सराई, कमळाबाई पारधी, ताईबाई आगिवले, बबन खडके, गणेश सराई, चिऊबाई आगिवले, घोटी खुर्द – सरपंच माणिक बिन्नोर, सोमज – सरपंच जिजाबाई काशिनाथ कुंदे, सदस्य लक्ष्मण कुंदे, म्हाळसाबाई कुंदे, शैलाबाई कोरडे, सत्यभामा कुंदे, कृष्णनगर – सरपंच वैशाली आंबवणे, सदस्य वाल्मीक तारडे, गणेश धोंगडे, लक्ष्मण पारवे, अनिता धोंगडे, अशोक जाधव, लक्ष्मीनगर – सरपंच सावित्री जोशी, सदस्य विजय दराणे, सुनीता दराणे, अर्चना मेमाणे, सुदाम बेंडकोळी, आशा जोशी, रामदास डोके, जनाबाई डोके, मोडाळे – सरपंच शिल्पा आहेर, सदस्य सीताबाई जगताप, मंदा बोडके, गोरख गोऱ्हे, आशा गांगड, वनिता गोऱ्हे, सुरेश लहांगे, गणेश ढोन्नर, ज्ञानेश्वर झोले, काजल बिन्नर, नागोसली – सरपंच काशिनाथ होले, सदस्य अशोक शिंदे, सुरेखा धापटे, श्वेता गडाळे, आशा गिऱ्हे, लक्ष्मण शिद, सुमन मुतडक, धारगांव – सरपंच रेश्मा पुंजारा, सदस्य शिला गोवर्धने, शिरसाठे – सरपंच सुनीता सदगीर, सदस्य अनिता चंदगीर, दशरथ ढोन्नर, वर्षा बोडके, टाके घोटी – सरपंच माधुरी आडोळे, सदस्य संगीता मदन लहाने, पूजा मनोज भगत, प्रदीप दालभगत, कार्तिक आडोळे, कल्पना दोंदे, माधुरी आडोळे, आडवण – सरपंच निकिता आघाण, सदस्य धोंडीराम रेरे, तानाजी कोकणे, संगीता रेरे, यशवंता आघाण, मथाबाई कडाळे, नंदाबाई डाके, पांडुरंग कोकणे, माधवी डोळस, मीना आघाण, नांदगांव सदो – सरपंच अनिता राक्षे, सदस्य लीलावती भागडे, दुर्गेश भागडे, भिवा भागडे, उंबरकोन – सरपंच आत्माराम सारुक्ते, सदस्य काळू सारुक्ते, संजय सारुक्ते, गंगुबाई सारुक्ते, मच्छिन्द्र चेमटे, सुनंदा शिंदे, रोहिणी जगताप, वंदना सारुक्ते

Similar Posts

error: Content is protected !!