टाके घोटी ग्रामपंचायतीच्या दोन जागा बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज –  टाके घोटी ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक मधील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. पंचवीस वर्षाची परंपरा कायम ठेवत वार्ड एक मध्ये दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, माजी सरपंच नंदू भटाटे, नारायण नाठे, मदन लहाने, अनिल तोकडे, दशरथ भटाटे, रवींद्र भटाटे, रमेश मानवढे, गोरख दुभाषे, केशव लहाने, राजाराम लहाने, उत्तम लहाने, संजय शेलार, हिंमत लहाने, सूर्यकांत भगत, हिरामन लहाने, अरुण लहाने यांच्या नेतृत्वाखाली या जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्वसाधारण वार्ड क्रमांक एक मध्ये संगीता मदन लहाने, तर त्याच प्रभागात अनुसूचित जमाती स्त्री राखीव या जागेसाठी पूजा मनोज भगत यांचा एकमेव अर्ज आल्याने ही जागा अविरोध झाली आहे. प्रभाग एक मध्ये आदिवासी मतदार नसल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. या निवडीसाठी चंद्रकांत भगत, धोंडीराम भटाटे, नामदेव लहाने, रामदास लहाणे, सुरेश लहाने यांच्यासह जय बजरंग मित्र मंडळ यांनी या निवडीसाठी परिश्रम घेतले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!