इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील जनसेवा प्रतिष्ठानतर्फे एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान रामा मधे यांना मानाचा स्वामी गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. गुरुवारी २४ ऑगस्टला इगतपुरी येथील आर. जी. चांडक माहेश्वरी मंगल कार्यालयात दुपारी २ वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर यांनी दिली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील शिक्षकांसाठी असणाऱ्या आयसीटीसी कोर्ससाठी जिल्ह्यातील १ हजार १४८ नोंदणी केलेल्या शिक्षकांपैकी ५२४ शिक्षकांनी यशस्वीपणे कोर्स पूर्ण केला. ह्यातील पहिल्या ७० शिक्षकांना प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये खैरगाव जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक विलास जगन्नाथ गवळे सरांनी यांनी उत्कृष्टपणे हा कोर्स पूर्ण करुन टॉप ३ मध्ये स्थान प्राप्त […]
इगतपुरीनामा न्यूज – राजयोग प्रतिष्ठानतर्फे इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. उद्या रविवारी १३ ऑगस्टला वतीने पालकमंत्री आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. गोंदे दुमाला येथील लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी ११ […]
इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा धरण प्रकल्पासाठी जमिनी संपादित झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेली शेकडो एकर उपयुक्त जमिनी मूळ मालकांना परत करण्याबद्धल राज्य शासन सकारात्मक आहे. यासाठी विधिमंडळात सातत्याने पाठपुरावा केला असून ह्याला लवकरच यश मिळणार आहे. आवळी भागातील सामान्य शेतकऱ्यांना ह्याचा चांगला फायदा होणार आहे. यामुळेच येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने माझा यथोचित सन्मान केला. याबद्धल मी सर्वांचे […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रात निवड झालेल्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आवळी दुमाला ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे विशेष सत्कार सोहळा आज सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी वैतरणा धरण परिसरातील १४ गावांच्या संपादित जमिनीचा प्रश्न विधिमंडळात मांडला. हा प्रश्न तीन महिन्यात मार्गी लावू असा शब्द विधानसभा […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाJEE व NEET परीक्षेच्या तयारीसाठी निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची मोफत व्यवस्था शासन करणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात परीक्षा घेण्यात आली. ह्यासाठी २ हजार ३३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून १६३ विद्यार्थ्यांची […]
इगतपुरीनामा न्यूज – जानोरी येथील तेजस उत्तम भोर याची राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, युवक तालुकाध्यक्ष किरण कातोरे, उमेश खातळे, वैभव धांडे यांच्या उपस्थितीत तेजस भोर यांची निवड करण्यात आली. माजी सरपंच सुदाम भोर ,तुकाराम भोर, बाळासाहेब भोर, एकनाथ भोर, तुषार गायकर, […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी गोरख बोडके यांच्या नियुक्तीबद्दल मुकणे ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवराम झोले तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे संचालक सुनील जाधव, भरत आरोटे, माजी संचालक विष्णु पाटील राव, माजी सभापती गणपत पाटील राव, सरपंच हिरामण राव, […]
इगतपुरीनामा न्यूज – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाशिकचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडील. या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कार्य करण्यावर भर देणार आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीकडून सोपवलेली जबाबदारी जनकल्याण आणि पक्षबांधणीसाठी उपयोगी ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन कार्यकारी जिल्हाध्यक्ष […]
इगतपुरीनामा न्यूज – मायदरा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव ठोकळ तर व्हॉइस चेअरमनपदी नामदेव लांघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आनंदा घोरपडे व दत्तू केवारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागांची निवडणूक घेण्यात आली. मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, घोटी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, संचालक सुनील जाधव, हरिदास लोहकरे […]