इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील समनेरे येथे दारणा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शुक्रवार दि. १५ रोजी ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवशाही संघटनेचे अध्यक्ष तथा आयोजक ॲड. रोहीत उगले यांनी ही माहिती दिली. यावेळी पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या समनेरे गावच्या प्रथम महिला पोलीस कु. अश्विनी जाधव […]
इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थी जीवनात प्रामाणिक प्रयत्न आणि परिश्रम घेऊन ध्येय निश्चित केल्यास यश प्राप्त होते. गुणवत्तेला कार्यक्षमतेची जोड देऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज हितासाठी करावा. संघर्ष केल्याशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होणार नाही. पराजयात मोठ्या विजयाची नांदी लपलेली असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे हा जीवनाचा मुलमंत्र असला पाहीजे असे प्रतिपादन व्ही. एन. नाईक […]
इगतपुरीनामा न्यूज – शिक्षक ध्येय, ज्ञानसंवाद, संत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हिंगणघाट, जि. वर्धा, नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर, निंभोरकर होमिओ फार्मसी, अमरावती आणि वसुधा नाईक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या […]
इगतपुरीनामा न्यूज – दुबई येथे पार पडलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय ब्युटी सेमिनार व ब्युटी टॅलेंट शो अंतर्गत ब्युटी टॅलेंट शो मध्ये नासिक जिल्ह्यातील वाकी बिटूर्ली ता. इगतपुरी येथील ग्रामसेविका ज्योती कमलेश केदारे – शिंदे यांना मिसेस दुबई इंटरनॅशनल क्लासिक अवॉर्ड २०२३ ने मिसेस दुबई २००९ यांच्या हस्ते व सनशाईन ब्युटी अकादमीच्या संचालिका विनी कौर राजपुर यांच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका माधुरी केवळराव पाटील यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील शाळांत त्यांनी प्रभावी काम केले आहे. विद्यार्थ्यांतील कलागुण ओळखत त्यांना तंत्रज्ञानाचे धडे […]
इगतपुरीनामा न्यूज – भावली खुर्द येथील उपसरपंच कै. दौलत भगत यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदाची आज निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश बाळू आगिवले यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच जिजाबाई एकनाथ आगिवले यांनी अध्यासी अधिकारी काम पाहिले. ग्रामसेविका रुपाली जाधव यांनी त्यांना सहाय्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ कमळु आगिवले, यशवंत […]
इगतपुरीनामा न्यूज – कामाचा माणूस, हक्काचा माणुस असलेले उपमुख्यमंत्री ना. अजित पवार ओळखले जातात. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचा सर्वागिण विकास करण्यासाठी राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत गोरख बोडके बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष […]
संदीप कोतकर : इगतपुरीनामा न्यूज – प्रत्येकाने आपल्या जीवनाचे ध्येय ठरवणे फार गरजेचे आहे. जीवनात स्पष्टता असणे महत्त्वाचे असून देशभक्ती वृद्धिंगत होऊन देशभक्त तयार झाले पाहिजे. लोकप्रतिनिधी लोकांसाठी उपलब्ध नसेल तर त्याला संविधानिक पद्धतीने हाणून पाडले पाहिजे. आपण सर्वांनी लोकशाहीचे शिल्पकार व्हा असे आव्हान ‘जागृत नाशिक जागृत भारत ‘अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्री कंठानंद यांनी केले. […]
इगतपुरीनामा न्यूज – श्री स्वामी समर्थ मंडळ व श्री जनसेवा प्रतिष्ठान, इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी येथे गुरुवारी गुणवंत विद्यार्थी गुण गौरव आणि स्वामी गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असून घोटी मर्चंट बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान होणार आहे. उद्या गुरुवारी २४ ऑगस्टला दुपारी २.३० वाजता […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील श्री स्वामी समर्थ मंडळ आणि जनसेवा प्रतिष्ठानतर्फे पत्रकारितेवर प्रभुत्व असलेले आदर्श पत्रकार शैलेश पुरोहित यांना “स्वामी गौरव” पुरस्कार घोषित झाला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर यांनी याबाबत माहिती दिली. उद्या गुरुवारी दुपारी अडीच वाजता आर. जी. चांडक माहेश्वरी मंगल कार्यालयात पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारितेची कोणतीही […]