इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील शिक्षकांसाठी असणाऱ्या आयसीटीसी कोर्ससाठी जिल्ह्यातील १ हजार १४८ नोंदणी केलेल्या शिक्षकांपैकी ५२४ शिक्षकांनी यशस्वीपणे कोर्स पूर्ण केला. ह्यातील पहिल्या ७० शिक्षकांना प्रोत्साहनपर पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये खैरगाव जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक विलास जगन्नाथ गवळे सरांनी यांनी उत्कृष्टपणे हा कोर्स पूर्ण करुन टॉप ३ मध्ये स्थान प्राप्त मिळवले. त्यांना पारितोषिक स्वरुपात संगणक विज्ञान प्रयोगशाळेसाठी ८ संगणक व एक लॅपटॉप देण्यात आला असून या सर्व साहित्याची किंमत जवळपास चार ते साडेचार लाख रुपये एवढी आहे. विलास गवळे ह्यांना यापूर्वी जिल्ह्याचा तसेच राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्यासाठी मिळणार आहेत. याबद्धल खैरगांव ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. लोकनियुक्त सरपंच तथा बाजार समितीचे संचालक ॲड. मारुती आघाण यांनी विलास गवळे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. यावेळी उपसरपंच गणेश गायकर, मुख्याध्यापक निंबा मोरे, मच्छिंद्र गायकर, रामदास जाखेरे, विठ्ठल आघाण, ग्रामसेविका सुवर्णा आहेर, मिलिंद जगताप, नारायण दालभगत, अंकुश तोकडे, सुदाम गभाले, ईश्वर दालभगत, रघुनाथ बोराडे, अशोक गभाले, मधुकर दालभगत, राजू गायकर आणि ग्रामस्थ हजर होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group