मायदरा सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव ठोकळ, व्हॉइस चेअरमनपदी नामदेव लांघे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – मायदरा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव ठोकळ तर व्हॉइस चेअरमनपदी नामदेव लांघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आनंदा घोरपडे व दत्तू केवारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागांची निवडणूक घेण्यात आली. मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, घोटी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, संचालक सुनील जाधव, हरिदास लोहकरे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे, टाकेदचे उपसरपंच रामचंद्र परदेशी, मायदरा सोसायटीचे संचालक यशवंत करवंदे, जिजाबाई लगड, अनुसया गभाले, दत्तू केवारे, महादू केवारे, जयराम लोहकरे, तुळशीराम केवारे, आनंदा घोरपडे, गंगाराम धोंगडे, श्रीपत लगड, संतू घाणे, एकनाथ वाघ, लक्ष्मण बांबळे, नवसू ठोकळ, उपसरपंच बहिरू केवारे, पोपट केकरे, महेश गभाले, नारायण गभाले, किसन ठोकळ, भोरू करवंदे, यशवंत गभाले, गणेश गभाले, काळू लांघे, सुनील ठोकळ, केशव करवंदे, योगेश करवंदे, सुरेश लांघे, हनुमान करवंदे, मकाजी गभाले, पांडुरंग मेमाणे, दतू गभाले, मधुकर करवंदे, पंढरी भांगरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रामा ठोकळ यांनी तर आभार हरिदास लोहकरे यांनी मानले.

Similar Posts

error: Content is protected !!