राजयोग प्रतिष्ठानतर्फे उद्या इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार वितरण सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबीर

इगतपुरीनामा न्यूज – राजयोग प्रतिष्ठानतर्फे इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना इगतपुरी रत्नगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. उद्या रविवारी १३ ऑगस्टला  वतीने पालकमंत्री आणि विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे. गोंदे दुमाला येथील लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी माहिती राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आत्माराम मते यांनी केले आहे.

कार्यक्रमासाठी नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे, सिने अभिनेते किरण भालेराव, नाशिकचे आमदार राहुल ढिकले, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी सभागृह नेता दिनकर पाटील, मनसे नेते डॉ. प्रदीप पवार आदींसह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. इगतपुरी तालुक्यातील आदर्श शेतकरी, डॉक्टर, वकील, वारकरी सांप्रदाय, शाहीर, गडकिल्ले संवर्धक, शिक्षक, पत्रकार, रुग्णसेवक, आरोग्य सेवक, उद्योजक, क्रीडापटू, आदर्श महिला, यावर्षीचे आयपीएस अधिकारी, सैन्यातील जवान आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेल्या सर्वाचा सन्मान करण्यात येणार आहे. तालुक्यातील शाळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या १० वी १२ वी च्या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान केला जाईल.

Similar Posts

error: Content is protected !!