
इगतपुरीनामा न्यूज – जानोरी येथील तेजस उत्तम भोर याची राष्ट्रवादी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, युवक तालुकाध्यक्ष किरण कातोरे, उमेश खातळे, वैभव धांडे यांच्या उपस्थितीत तेजस भोर यांची निवड करण्यात आली. माजी सरपंच सुदाम भोर ,तुकाराम भोर, बाळासाहेब भोर, एकनाथ भोर, तुषार गायकर, ऋषिकेश वेल्हाळ, विनोद जाधव, लखन जाधव, सुजित खांदवे, रोहन भोर, दिपक भोर, विनायक भोर, नामदेव भोर आदींनी तेजस भोर यांना शुभेच्छा दिल्या. भविष्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या अडचणी सोडवण्यासाठी कायम कटिबध्द राहणार आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून युवकांसाठी जीव ओतून काम करेन अशी ग्वाही तेजस भोर यांनी दिली.