आवळी दुमाला ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा धरण प्रकल्पासाठी जमिनी संपादित झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेली शेकडो एकर उपयुक्त जमिनी मूळ मालकांना परत करण्याबद्धल राज्य शासन सकारात्मक आहे. यासाठी विधिमंडळात सातत्याने पाठपुरावा केला असून ह्याला लवकरच यश मिळणार आहे. आवळी भागातील सामान्य शेतकऱ्यांना ह्याचा चांगला फायदा होणार आहे. यामुळेच येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने माझा यथोचित सन्मान केला. याबद्धल मी सर्वांचे ऋण व्यक्त करीत असून आगामी काळात ह्या परिसरात उर्वरित विकासासाठी कटीबद्ध असल्याचा शब्द देतो असे प्रतिपादन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले  इगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवरांचा विशेष सत्कार सोहळा संपन्न झाला. शिरसाठे जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व केलेले गोरख बोडके यांच्या विविधांगी कार्याची दखल घेऊन त्यांची निवड राष्ट्रवादीच्या कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदावर झाली. याबद्धल त्यांनाही ग्रामस्थांनी सन्मानित केले. काँग्रेस नेते मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक ॲड. संदीप गुळवे, घोटी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, उपसभापती शिवाजी शिरसाठ, संचालक संपत वाजे, अर्जुन पोरजे, खरेदी विक्री संघाचे संचालक पांडुरंग खातळे आदींच्या कार्याबद्धल त्यांना सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत आवळी दुमाला आणि ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला इगतपुरीचे माजी नगरसेवक संपत डावखर, आवळी दुमालाचे सरपंच रामदास जमधडे, ज्ञानेश्वर जमधडे, रोहिदास जमधडे, पंढरी जमधडे, हौशीराम मेदगे, धोंडीराम जमधडे, सुरेश जमधडे, कुंडलिक जमधडे, विश्वनाथ जमधडे, मोहन जमधडे, विष्णू जमधडे, गोपाळ जमधडे, शिवाजी जमधडे, दिनकर जमधडे, माजी सरपंच दशरथ जमधडे आणि परिसरातील विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

Similar Posts

error: Content is protected !!