राष्ट्रवादीचे नूतन कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांचा मुकणे ग्रामपंचायतीतर्फे सत्कार : गावासाठी व्यायामशाळा साहित्य मिळवून देणार – गोरख बोडके

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी गोरख बोडके यांच्या नियुक्तीबद्दल मुकणे ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवराम झोले तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे संचालक सुनील जाधव, भरत आरोटे, माजी संचालक विष्णु पाटील राव, माजी सभापती गणपत पाटील राव, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाध्यक्षपदाद्वारे विविध विकासकामांसाठी आपण सदैव तत्पर राहु असे नूतन कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी सांगितले. सत्तेमुळेच विकासाला वाव मिळतो. विकासात्मक दृष्टिकोनातून सर्वांनी राष्ट्रवादीला साथ देण्याचे आवाहन करत गोरख बोडके यांच्यारूपाने सक्षम व्यक्तीची कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी निवड पक्षश्रेष्ठींनी केल्याचे गौरवोद्गार माजी आमदार शिवराम झोले यांनी काढले.

बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव गावातील तरुणांसाठी व्यायामाचे साहित्य मिळण्याची मागणी केली. गोरख बोडके यांनी तात्काळ क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना दुरध्वनीवरून संपर्क साधला असता महिनाभरात व्यायामाचे संपूर्ण साहित्य देणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रामदास राव, मोहन बोराडे, सोसायटी उपाध्यक्ष काळु आवारी, पोपट राव, चंद्रभान बोराडे, सुरेश आवारी, मनोहर आवारी, काळु मुकणे, तेजस राव, राजाराम बोराडे, नवनाथ राव, निवृत्ती राव, रुंजा खांदवे, संजय बोराडे, भिमा शिरसाठ, तुकाराम वेल्हाळ, सुनील राव, गणेश राव, किरण भवर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर आवारी यांनी तर आभार ग्रामसेवक उमेश खैरनार यांनी मानले.

Similar Posts

error: Content is protected !!