
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रात निवड झालेल्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आवळी दुमाला ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांतर्फे विशेष सत्कार सोहळा आज सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी वैतरणा धरण परिसरातील १४ गावांच्या संपादित जमिनीचा प्रश्न विधिमंडळात मांडला. हा प्रश्न तीन महिन्यात मार्गी लावू असा शब्द विधानसभा अध्यक्ष यांनी दिला. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांची मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या संचालकपदी आणि जिल्हा संघावर बिनविरोध निवड झाली. गोरख बोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाली. घोटी बाजार समितीचे नूतन सभापती ज्ञानेश्वर लहाने, उपसभापती शिवाजी शिरसाठ, संचालक संपत वाजे, अर्जुन पोरजे, खरेदी विक्री संघाचे संचालक पांडुरंग खातळे आदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाला अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत आवळी दुमाला आणि ग्रामस्थांनी केले आहे.