इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी तालुक्यात आज एकाच दिवशी फक्त ५ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. कोरोना बाधितांची संख्या कमी होऊन कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज १० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार इगतपुरी तालुक्यात फक्त १३० कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी “इगतपुरीनामा” ला दिली.
रुग्णवाहिका चालकांना स्वसंरक्षण साहित्याचे वाटप
आज गोरखभाऊ बोडके युवा फाऊंडेशन आणि कोविड मदत कक्ष ग्रुपतर्फे रुग्णवाहिका चालकांना प्रत्येकी दोन पीपीई किट, N95 मास्क वाटप करण्यात आले. इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात झालेल्या ह्या कार्यक्रमप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, अनिल भोपे, ऍड. हनुमान मराडे, योगेश भागडे, किरण फलटणकर, वसीम सय्यद, महेश शिंरोळे, डॉ. स्वरूपा देवरे आदी हजर होते.
कोरोना व्हायरसचा ( Covid-19 ) संसर्ग झाला आहे की नाही ? हे तपासून पाहण्यासाठी रक्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही. कोरोना लक्षणग्रस्त व्यक्तीचे घशातील स्त्रावाचे नमुने आणि नाकातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीही तपासणी केली जाते. यावरून संशयित रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे की नाही ? हे ठरवलं जातं. अन्यथा, रुग्णाला घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रकृती पूर्णतः सुधारेपर्यंत रुग्णाला पुढील १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहणं आवश्यक आहे. ह्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता